लोकांचा महाविकास आघडीला पाठिंबा...
शरद पवार यांनी सांगितले की, मी जवळपास सगळ्याच जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. लोकसभेत जनतेने पाठिंबा दिला. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जनता पाठिंबा देईल, अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. मविआ सरकार हे जनतेच्या प्रश्न सोडवणारे सरकार असेल, आमची आघाडी यासाठी काम करेल असा विश्वास मी याठिकाणी देत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
advertisement
युगेंद्रला काय कानमंत्र दिला?
यंदाची बारामतीची निवडणूक रंगतदार होणार असल्याचा अंदाज आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत बारामती विधानसभा क्षेत्रातून सुप्रिया सुळे यांना 48 हजारांची आघाडी होती. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
युगेंद्र पवार यांचा अर्ज भरल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी युगेंद्रला काय कानमंत्र द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, जनतेशी बांधिलकी कायम ठेवावी, विनम्रतने लोकांशी वागलं पाहिजे, त्याशिवाय, लोकांनी संधी दिल्यानंतर विनम्रतेने स्वीकार करून लोकांसाठी काम करावे, असे शरद पवारांनी म्हटले.
बारामतीकरांवर विश्वास...
बारामतीमधून युगेंद्र पवार हा तरुण उमेदवार दिला असल्याचे शरद पवारांनी म्हटले. युगेंद्र हा उच्चशिक्षित पदवीधर असून व्यावसायिक, प्रशासनाचा अनुभव आहे. साखर कारखानदारी, ऊस यातील युगेंद्र जाणकार आहेत. बारामतीची जनता नव्या पिढीचा नव्या नेतृत्वाचा स्वीकारतील असा विश्वास असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
