काँग्रेस नेते आणि आमदार नितीन राऊत यांनी 'न्यूज 18 लोकमत' सोबत बोलताना काही गोष्टी मान्य केल्या आहेत. जागा वाटपात काँग्रेस सोशल इंजिनिअरिंग करता आले नसल्याची खंत नितीन राऊत यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीमध्ये असल्याने सोशल इंजिनिअरिंगच्या ऐवजी इलेक्टिव्ह मेरिट हा मुद्दा लक्षात घ्यावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. या इलेक्टिव्ह मेरिटवर जागा वाटप झाल्याने सोशल इंजिनिअरिंगवर भर देता आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
तर आम्हाला निवडणुकीत फटका...
नितीन राऊत यांनी म्हटले की, तेली, हलबा, मुस्लिम या समाजाची पार्श्वभूमी असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देता आली नाही. याचा फटका आम्हाला बसू शकतो. त्यामुळे ही बाब लक्षात घेता हायकंमाडसोबत चर्चा व्हायला हवी असेही त्यांनी सांगितले. उमेदवारीत प्रतिनिधीत्व न मिळालेल्या समाजघटकांसोबत चर्चा करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. भाजप सोबत काँग्रेसची थेट लढत अनेक जागांवर होत असल्याने काँग्रेस समोर आव्हान असेल हेदेखील त्यांनी नमूद केले.
बौद्ध समाजाचा मुख्यमंत्री हवाय...
नितीन राऊत यांनी सांगितले की, देशात आजपर्यंत बौद्ध समाजाचा मुख्यमंत्री झाला नाही. महाराष्ट्रात बौद्ध समाजाचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडी आणि काँग्रेस हायकमांड निर्णय घेतील असेदेखील राऊत यांनी सांगितले.
