आजपासून राज्यात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारनंतर आज निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, या बालेकिल्ल्याची तटबंदी भेदत भाजपने विदर्भाच्या किल्ल्यावर आपला झेंडा रोवला. आता, काँग्रेसकडून विदर्भात पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. विदर्भातील अनेक जागांवर काँग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ सामना होणार आहे. विदर्भात रण जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आदींसह इतर नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत.
advertisement
विदर्भात यापूर्वी भाजपला चांगले यश मिळाले होते. या भागातील अनेक जागांवर काँग्रेससोबत थेट लढत असणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर भाजपने आता आपले लक्ष विदर्भाकडे केंद्रीत केले आहे.
मिशन विदर्भसाठी कोणत्या नेत्याची कोणती सभा?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार,राज ठाकरे आपापला उमेदवारांसाठी मागणार मतांचा जोगवा
- 5 नोव्हेंबरला राज ठाकरे वणीमध्ये घेणार सभा
- 6 नोव्हेंबरला राहुल गांधी यांची नागपूरात सभा
- 7 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची दर्यापूर, बडनेरा, तिवसामध्ये सभा
- 7 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दर्यापूर, रामटेक, भंडारामध्ये सभा
- 7 नोव्हेंबरला शरद पवार नागपूर, तिरोडा, काटोल मध्ये घेणार सभा
- 8 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे बुलढाणा, मेहकर मध्ये घेणार सभा
- 8 नोव्हेंबरला शरद पवार हिंगणघाट मध्ये घेणार सभा
- 9 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमूर मध्ये येणार सभा
