मनसे नेते आणि माहीम विधानसभेतील उमेदवार अमित ठाकरे यांनी न्यूज 18 सोबत बोलताना मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. अमित ठाकरे यांना आरक्षणाच्या मागणीबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांचा मुद्दा चुकीचा नाही त्याचा उद्देश चुकीचा नाही. ते आपल्या मागण्यासाठी माणसांसाठी लढत आहेत. पण त्यांना काय हवे आहे, तर नोकरी आणि शिक्षण हवं आहे. हे नोकरी आणि शिक्षण आपण आरक्षणाच्या माध्यमातून नसलं तरी आपण देऊ शकतो. आरक्षण असल्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास असतो की आपल्या संधी मिळण्याची मोठी शक्यता आहे. ही संधी राज ठाकरे यांचे सरकार आल्यावर मिळणार हेच तुमचं आरक्षण आहे, समजा असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
advertisement
राज ठाकरे सगळे प्रश्न सोडवतील...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नोकरी आणि शिक्षणाचा प्रश्न सोडवतील असे अमित ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या हातात सत्ता आल्यावर भूमिपुत्रांना नोकरीचा आणि शिक्षणाचा प्रश्नच नसणार, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले. तुमच्या गरजा मिटल्या की प्रश्न सुटतील आणि आपण हे सहजपणे प्रश्न सोडवू शकतो, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
भाषा आणि धर्म महत्त्वाचा...
अमित ठाकरे यांना हिंदुत्वावर प्रश्न विचारले असता त्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांचे भाषण ऐकल्यानंतर मला धर्म आणि भाषा महत्त्वाचे वाटू लागले. राज ठाकरे पूजा करतात पण अंधभक्ती ते मान्य करत नाहीत. अमित ठाकरे यांनी म्हटले की, धर्म अतिशय महत्वाचा आहे. खूप कमी देश आहे जिथे हिंदू धर्म आहे. हिंदूत्व म्हणजे इतर धर्मांचा द्वेष नाही असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
