आज सकाळी मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काही नेत्यांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील, निशिकांत पाटील, काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी, नांदेडचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार देवेंद्र भुयार आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
सुनील टिंगरे यांनी काय म्हटले?
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी म्हटले की, ही जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यामुळे शंका नव्हती पण सगळ्यांना जागा मागत असतात. महायुती प्रचार सर्वजण करतील. आदेश आला की सर्वजण काम करतील असे त्यांनी म्हटले. कल्याणी नगर अपघात प्रकरणाचा सर्व बाबी स्पष्ट झाल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
पुण्यातील लक्षवेधी लढत
वडगाव-शेरीमध्ये आता पुण्यातील लक्षवेधी लढत होणार आहे. सुनिल टिंगरे विरुद्ध बापू पठारे अशी ही लढत होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपच्या जगदीश मुळीकांची भूमिका गुलदस्त्यात आहे. बापू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणुकीच्या मैदानात आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. वडगाव शेरीमध्ये बापू पठारे यांचे चांगलेच वर्चस्व आहे. त्यामुळे या ठिकाणी हायव्होलटेज लढत होणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांना 97,708 मते मिळाली होती. तर, भाजपच्या जगदीश मुळीक यांनी 92,752 मते मिळवली. 2014 च्या निवडणुकीत जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांचा 5,325 मतांनी पराभव केला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दुसऱ्या यादीत कोणाला संधी
शिरुर - ज्ञानेश्वर कटके
तासगाव - संजयकाका पाटील
इस्लामपूर- निशिकांत पाटील
अणुशक्तीनगर- सना मलिक
वांद्रे पूर्व- झिशान सिद्दिकी
वडगाव शेरी - सुनील टिंगरे
लोहा- प्रतापराव चिखलीकर
