जरांगेंच्या निर्णयावर पवार काय म्हणाले?
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर बैठक झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शरद पवार यांना मनोज जरांगेंच्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांनी सांगितले की, मनोज जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाशी आमचा संबंध नाही. मात्र, त्यांनी उमेदवार उभे केले असते तर भाजपला फायदा झाला असता असेही त्यांनी सांगितले.
advertisement
बंडखोरांवर कारवाई होणार...
शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मागील काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज घेण्याबाबत आमच्यात चर्चा सुरू होती. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवत आहोत. अपक्ष, बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ते अर्ज मागे घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जागा वाटपानंतर इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील पक्षांसमोर आहे. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू शकतो.
