TRENDING:

Maharashtra Elections Results Vidarbha : सत्तेच्या 'समृद्धी' महामार्गावर सुस्साट धावणार? विदर्भाचा कौल काय?

Last Updated:

Maharashtra Elections Results Vidarbha Region : महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग 62 जागा असलेल्या विदर्भातून जातो. विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्र जिंकू शकतो हे लक्षाात घेता महायुती आणि महाविकास आघाडीने जोर लावला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग 62 जागा असलेल्या विदर्भातून जातो. विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्र जिंकू शकतो हे लक्षात घेवून भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ सुरु केलं. त्यासाठी थेट मोदीच मैदानात उतरले आणि त्यांनी लगेचच काँग्रेसला टार्गेटवर घेतलं. तर, दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने कापूस, सोयाबीन आणि इतर मुद्यांवरून सरकारला घेरण्यााचा प्रयत्न केला. आता विदर्भातील जनता कोणाला कौल देणार, यावर सत्तेची गणितं आहेत.
Maharashtra Elections Results Vidarbha : सत्तेच्या 'समृद्धी' महामार्गावर सुस्साट धावणार? विदर्भाचा कौल काय?
Maharashtra Elections Results Vidarbha : सत्तेच्या 'समृद्धी' महामार्गावर सुस्साट धावणार? विदर्भाचा कौल काय?
advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन विदर्भ

धुळ्यातून महाराष्ट्रातल्या झंझावाताला सुरुवात केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विदर्भाच्या रणमैदानात उतरले. मोदींनी अकोल्यातील सभेत महाविकास आघाडीतील ठाकरे पवारांवर मौन बाळगत फक्त काँग्रेसलाच निशाण्यावर घेतलं. विदर्भात मोदींचं टार्गेट फक्त काँग्रेस आहे त्याचं कारणही तसंच होतं. विदर्भातील एकूण 62 जागांपैकी 35 जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे.

advertisement

भाजपसाठी विदर्भ महत्त्वाचा...

महाराष्ट्र जिंकायचा असेल तर भाजपला विदर्भ जिंकणं महत्वाचं आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भाला मोदी लाटेनंतर मोठं भगदाड पाडलं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 44 जागा जिंकल्या. 2019 मध्ये भाजपला सेटबँक बसला आणि 44 वरून भाजप 29 जागांवर आलं.

लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर 2014 साली महायुतीने 10 पैकी 10 जागा जिंकल्या. 2019 मध्ये 10 पैकी 9 जागा जिंकल्या. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. 10 जागांपैकी महायुतीला केवळ 3 जागा मिळाल्या. विधानसभेनुसार लोकसभेचा निकाल पाहिल्यास महाविकास आघाडीला 42 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली तर महायुतीला केवळ 20 जागांवर आघाडी मिळाली.

advertisement

हेच कारण आहे भाजपला हातातून निसटलेली जमीन पुन्हा मिळवायची आहे. त्यासाठी मोदी शाह यांनी पूर्ण ताकदीनं मशागत केली. त्यासाठीच ओबीसींना साद घालताना दलित समाजाला आपलसं करण्याचा भाजप अटोकाट प्रयत्न केला. त्याला शह देण्यासाठीच काँग्रेसनं राहुल गांधींना विदर्भात उतरवरून संविधान बचाव आणि जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली.

महाराष्ट्रातील मुंबई - पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे प्रादेशिक पक्ष आपापसात लढताहेत. तर विदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात थेट लढत होतीय. त्यामुळे काँग्रेसला नमवून विदर्भ काबीज करण्याचा आणि विदर्भातून महाराष्ट्राच्या सत्तेचा सोपान सर करण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्याला विदर्भ किती साथ देतो हे पाहाणं महत्वाचं आहे.

advertisement

लोकसभा निवडणुकीत काय?

भाजपला विदर्भात धक्का बसला. लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीत 10 पैकी 10 जागा भाजपला मिळाल्या. तर 2019 10 पैकी 9 जागा मिळाल्या. 2024 10 पैकी 3 जागा भाजपला जिंकता आल्या. लोकसभेतील कलानुसार, 42 विधानसभेत मविआला आघाडी असून

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

20 विधानसभेत महायुतीला आघाडी आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Results Vidarbha : सत्तेच्या 'समृद्धी' महामार्गावर सुस्साट धावणार? विदर्भाचा कौल काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल