जागा वाटपानंतर इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील पक्षांसमोर आहे. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू शकतो. राष्ट्रवादीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच बंडखोरांशी चर्चा करून माघारीचे आवाहन केले. त्याला यश मिळाले आहे. बंडखोरी कितपत कायम राहते, हे अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यावर स्पष्ट होणार आहे.
advertisement
भूम परंडाचा उमेदवार ठरला...
भूम परंडा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील उमेदवार होते. दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. मात्र, या ठिकाणी ठाकरे गटाचे राहुल पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. शरद पवार यांच्याशी फोनवरून राहुल पाटील यांची चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंडखोर उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि स्वत: शरद पवारांनी नाराज उमेदवारांसोबत चर्चा केली. काहीजणांना शरद पवार यांनी फोनवरून संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची सूचना केली.
>> शरद पवारांनी कुणाला फोन केले?
> पिंपरी- दीपक रोकडे
> श्रीवर्धन- ज्ञानदेव पवार
> अहेरी- संदीप कोरट
> संदीप बजोरिया - यवतमाळ
> पर्वती विधानसभा- बाबा धुमाळ
