TRENDING:

Maharashtra Cabinet : मुंबईत बायोगॅस प्रकल्प, 35 लाख घरे... राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले 8 महत्त्वाचे निर्णय

Last Updated:

Mahahrashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने 70 हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक या धोरणासाठी मंजूर केली आहे. आजच्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या 4 निर्णयांना मंजुरी मिळाली आहे.
News18
News18
advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या मंत्रिमंडळ बैठकीत प्रथमच सहभाग घेतला. सध्या त्यांना कोणतेही खाते देण्यात आलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना लवकरच अन्न व नागरी पुरवठा खाते दिले जाण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय पुढील प्रमाणे:

1) राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर

'माझे घर-माझे अधिकार' हे ब्रीद. 70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार

advertisement

(गृहनिर्माण विभाग)

2) बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार (नगरविकास विभाग)

3) उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)

advertisement

4) कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच 1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी (विधी व न्याय विभाग)

5) सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)

advertisement

6) अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी 2025.64 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)

7) पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 6394.13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

8) शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 4869.72 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet : मुंबईत बायोगॅस प्रकल्प, 35 लाख घरे... राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले 8 महत्त्वाचे निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल