दौंड नगर परिषद निवडणूक अतिशय चुरशीची मानली गेली. कारण अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षामध्ये दौंडमध्ये जोरदार रस्सीखेच होती. एकूण १३ प्रभागात २७ नगरसेवक पदांसाठी निवडणूक झाली. नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी जगदाळे, भाजपच्या मोनिका वीर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोमल रुपेश बंड हे उमेदवार होते. भाजप आमदार राहुल आणि प्रेमसुख कटारिया यांच्या पॅनेलसमोर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख आव्हान होते.
advertisement
दौंड नगरपरिषद निवडणूक निकाल
भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी - १७
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ९
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
प्रभाग क्रमांक १
अ) मुकेश जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस
ब) शाहिदा पानसरे, भाजप,पुरस्कृत
प्रभाग क्रमांक २
अ) राणी लष्करे, राष्ट्रवादी काँग्रेस
ब) विकास लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक ३
अ) सरोज कांबळे,भाजप,पुरस्कृत
ब) शाहनवाज खान पठाण,भाजप पुरस्कृत
प्रभाग क्रमांक ४
अ) रुचिता कटारिया, भाजप
ब) रोहित पाटील, भाजप
प्रभाग क्रमांक ५
अ) प्रणिता शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस
ब) इंद्रजित जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक ६
अ) सागर जगताप, भाजप
ब) स्वाती सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक ७
अ) कार्तिकी सोनवणे, भाजप
ब) मंगेश चलवादी, राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक ८
अ) छाया थोरात, भाजप
ब) वसीम शेख, भाजप
प्रभाग क्रमांक ९
अ) रेणुका थोरात, भाजप
ब) अथर्व सरणोत, भाजप
प्रभाग क्रमांक १०
अ) योगेश कटारिया, भाजप पुरस्कृत
ब) मनीषा पॉल जाधव, भाजप पुरस्कृत
प्रभाग क्रमांक ११
अ) जीवराज पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
ब) उज्वला परकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक १२
अ) वैशाली माशाळकर,भाजप पुरस्कृत
ब) निलेश पवार, भाजप पुरस्कृत
प्रभाग क्रमांक १३
अ) विजय बोरकर, भाजप पुरस्कृत
ब) ज्योती राऊत, भाजप पुरस्कर्ते
नगराध्यक्षपदासाठी कोणत्या पॅनेलकडून कोण उमेदवार होते?
मोनिका प्रमोद वीर - (भाजप नेते आमदार राहुल कुल आणि प्रेमसुख कटारिया यांची नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी)
दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)
कोमल रुपेश बंड - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष)
अजितदादा-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला होता
अजित पवार यांच्या जाहीर सभेत त्यांनी स्थानिक आमदार राहुल कुल यांना जोरदार लक्ष्य केले होते. निवडणुकीआधी दोन दिवस सभा घेऊन त्यांनी भाजपच्या बाजूला असलेले राजकीय वातावरण राष्ट्रवाजीच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी दौंड भकास केले, असल्या लोकांना संधी देऊ नका, अशी बोचरी टीका करीत निधीचे आमिष दाखवून दौंड बारामतीसारखे करू, असे आश्वासन दिले.
दुसरीकडे राहुल कुल यांनीही दौंडमध्ये प्रचारसभा घेऊन तसेच वॉर्डावॉर्डात जाऊन भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन मतदार राजाला केले. येत्या काळात दौंडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असेल, असे राहुल कुल यांनी जनतेला सांगितले.
एकंदर अजित पवार यांची राष्ट्रवादी अर्थात रमेश थोरात यांचे पॅनेल आणि राहुल कुल-प्रेमसुख कटारिया यांचे नागरिक हित संरक्षण मंडळ यांच्या पॅनेलमध्ये काँटे की टक्कर झाली.
