अजित पवारांच्या अपघाती निधनानं सर्वांनाच धक्का बसला. राजकारणातील उमदं व्यक्तीमत्व असलेल्या अजित पवारांची अकाली एक्झिट महाराष्ट्राला सून्न करणार ठरली. ज्या बारामतीतून राजकारणाला सुरूवात केली त्याच बारामतीच्या मातीत अजित पवारांनी अंतिम श्वास घेतला. लोकनेता सोडून गेल्यामुळे पोरकं झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या घटनेला २४ तास उलटले तरी दादा आपल्यात नाही हे पचवणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. अबाल-वृद्ध यांच्या सर्वांच्या भावना सारख्याच होत्या. आपण पोरके झालोत, ही उचंबळून आलेली भावना अश्रू आणि हुंदक्यांच्या रूपानं बाहेर पडत होती.
advertisement
आमच्या दादाला I Love You सांग...
अजित पवारांच्या अखेरच्या प्रवासासाठी पार्थ पवार हे त्यांचे पार्थिव रुग्णालयातून आणण्यासाठी सकाळी बारामती रुग्णालयात गेले. त्यावेळी देखील बारामतीच्या रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी होती. अनेक कार्यकर्ते हे इतर जिल्ह्यातून दादांच्या शेवटच्या दर्शनासाठी वाट पाहत होते. या उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना पार्थ पवारांना पाहताच जोरात आवाज दिला. पार्थ दादा... ऐ पार्थ दादा... आमच्या दादाला I Love You सांग... असा निरोप दिला.
व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही
कार्यकर्त्याचे अजितदादांवर असलेले प्रेम पाहत पार्थ पवारांनी देखील त्याच्या भावनेचा आदर करत हाताने खुनावले की, तुझा निरोप मी तुझ्या लाडक्या दादाला पोहचवतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकला. व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
दादांसाठी सगळेच धाय मोकलून रडले
बारामतीच नव्हे राज्यातील सर्वच भागात अजित पवारांनी त्यांच्या कार्यातून अनेक कार्यकर्ते आणि नेते जोडले होते. सामान्य नागरिकांसोबत दादा जोडले गेलेले होते. कित्येकांना अजित पवारांनी मदत केली होती. त्यामुळे दादांच्या मृत्यूची बातमी कळताच राज्यभरातील नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक तातडीने बारामतीकडे रवाना झाले. दादांसोबतच्या अनेक आठवणींनी गहिवरून गेलेले नेतेही सामान्य माणसाप्रमाणे धाय मोकलून रडत होते.
दादांची अकाली एक्झिट, नागरिकांना धक्का
विमान अपघातातील मृत्यूमुळे अजित पवारांच्या झालेल्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राच्या मनावर मोठी जखम झालीय. प्रचंड उज्ज्वल राजकीय भविष्य असलेला आणि विकासाचं व्हिजन असलेला हा नेता राज्यासाठी मोठी संपत्ती होता. त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक कामं झाली होती. अनेक कामांना दादा गती देणार होते, तशी त्यांच्यात क्षमता होती. आणि त्याच दादांनी अकाली एक्झिट घेतल्यानं हा राज्यातील सर्वच नागरिकांना धक्का बसला आहे.
हे ही वाचा :
