चूक पायलटचीच? लँडिंग करताना कुठे चुकलं? अपघाताची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मोठी माहिती समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अजित पवारांच्या विमान अपघाताला तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक याबाबत तर्क वितर्क लढवले जात असताना तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तपासाबाबत मोठी अपडेट दिली आहे.
मुंबई : अजित पवारांना बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर अखेरचा निरोप देण्यात आला.शासकीय इतमामात दादांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला? या घटनेमागे तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक याबाबत तर्क वितर्क लढवले जात असताना तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी CNN NEWS18 ला तपासाबाबत मोठी अपडेट दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायलटला रन वे दिसत नसल्याची माहिती त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) दिली होती. लँडिंग सीक्वेन्स दरम्यान झालेल्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात लँडिंग सीक्वेन्समधील त्रुटीमुळे काही नुकसान झाले का, याचा तपास तपासा सध्या सुरू आहे.
बारामतीत लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी पवारांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. बारामतीत झालेल्या विमान अपघातामागील प्रमुख कारण खराब हवामान आणि कमी दृश्यमानता ही प्राथमिक कारणे समोर आले आहे. अपघातावेळी बारामतीमधील धावपट्टीच्या परिसरात दाट धुकं होतं. त्यामुळे दृश्यमानता जवळपास ८०० मीटर इतकीच होती. या प्रतिकूल स्थितीत वैमानिकानं विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरला.
advertisement
नेमकं सूत्रांनी काय माहिती दिली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , विमान टेबलटॉप एअरस्ट्रिपवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना पायलटने दृश्यमानतेची समस्या असल्याचे एटीसीला सांगितले होती. प्रथमदर्शनी विमान उतरवताना पायलटचा अंदाज चुकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र तपास अद्याप प्राथमिक टप्प्यावर असल्याने कोणताही निषकर्ष तूर्तास लावता येणार आहे. एवढच नाही तर धावपट्टी दिसत नसल्याचे पायलटने सागंताच त्याला गो राऊंड सांगितले होते. त्यानंतर पायलटने रनवेला एक चक्कर देखील मारली होती.
advertisement
काय आहेत शक्यता?
तज्ज्ञांच्या मते, विमान उतरवताना वैमानिकाला प्रामुख्याने व्हिज्युअल अॅप्रोच' घ्यावा लागतो. म्हणजेच, रनवे डोळ्यांनी स्पष्ट पाहूनच विमान जमिनीवर उतरवावे लागते. या ठिकाणी विमान लँडिंगसाठी इतर अत्याधुनिक तांत्रिक प्रणालींची मदत मर्यादित असते. त्यामुळे धावपट्टीचा अंदाज घेण्यात वैमानिकाची चूक झाली असावी किंवा ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवली असावी.
नेमका काय घडलं पायलटसोबत?
advertisement
- बारामतीमधील धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा नाही. त्यामुळे दाट धुक्यात आणि कमी दृश्यमानतेच्या स्थितीत लँडिंग अतिशय धोकादायक झालं. धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा असती, तर विमानाच्या लँडिंगला मदत झाली असती. चार्टर्ड विमान सुरक्षित उतरण्याची शक्यता वाढली असती.
- बारामती हे एक अनियंत्रित विमानतळ आहे, जिथे वाहतूक माहिती उड्डाण प्रशिक्षण संस्थांमधील वैमानिक/प्रशिक्षकांकडून दिली जाते. विमानाने बारामतीशी पहिला संपर्क 8 वाजून 18 मिनिटानी संवाद साधला. पुणे अॅप्रोचने विमानाला 30 नॉटिकल मैल अंतरावर सोडले.
- बारामतीमधील धावपट्टीच्या परिसरात दाट धुकं होतं. त्यामुळे दृश्यमानता जवळपास ८०० मीटर इतकीच होती. या प्रतिकूल स्थितीत पायलटला त्याच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार खाली उतरण्याची परवानगी देण्यात आली.
- धावपट्टी दिसत नसल्याने धावपट्टी ११ वर जाण्यासाठी पहिल्या अंतिम मार्गावर एक फेरी मारण्यात आली.
- फेरी मारल्यानंतर, पुन्हा अंतिम फेरी मारण्यात आली. सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याची नोंद करण्यात आली होती, परंतु नंतर धावपट्टी दृश्यमान असल्याचे करण्यात आली.
- धावपट्टी 11 साठी लँडिंग क्लियरन्स ८.४३ IST वाजता देण्यात आला, परंतु रीडबॅक मिळाला नाही
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 3:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चूक पायलटचीच? लँडिंग करताना कुठे चुकलं? अपघाताची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मोठी माहिती समोर








