राज्यातील शालेय शिक्षणात 'त्रिभाषा सूत्रा'नुसार पहिलीपासून हिंदींच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या वादावर आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी (26 जून) सकाळी भेट घेतली. या बैठकीत शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण सादर केले. त्यानंतरही राज ठाकरे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले. त्याशिवाय, राज ठाकरे यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावरही नाराजी व्यक्त केली.
advertisement
तिस-या भाषेचा समावेश आवश्यक का आहे, याची भूमिका राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आली. कला; क्रीडा विषयांचा अभ्यासक्रमातील गुणांकनासाठी समावेश असावा अशी सूचना राज ठाकरे यांनी बैठकीत केल्याची माहिती दादा भुसे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली होती. दादा भुसे, शालेय शिक्षण विभागाचे
राज ठाकरेंच्या एका प्रश्नाने दादा भुसेंची विकेट...
शिक्षण धोरणावरील चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना थेट प्रश्न केला. राज यांनी म्हटले की, “तुम्ही म्हणता ती सरकारची भूमिका आहे, पण बाळासाहेबांच्या शिवसेनेची या मुद्द्यावर नेमकी काय भूमिका आहे?” या प्रश्नाने क्षणभर वातावरण तणावपूर्ण झालं आणि उपस्थितांमध्ये शांतता पसरली. राज ठाकरेंच्या नेमक्या आणि धारदार शैलीतील या सवालाने दादा भुसे निरुत्तर झाले. त्यांनी लगेच कोणतंही उत्तर न देता मौन स्वीकारलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र...
राज्यातील शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून सध्या तीव्र राजकीय घडामोडी सुरू आहेत. हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, एकाच मुद्यावर दोन मोर्चे निघत असल्याचे चित्र होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत आता एकच मोर्चा निघणार असल्याचे जाहीर केले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये तारीख स्पष्ट केली नसली तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो आहे.