मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून नरेंद्र मेहता निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात गीता जैन यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मीरा-भाईंदर मतदारसंघातून सोमवारी गीता जैन यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. तर, नरेंद्र मेहतादेखील उत्सुक होते. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मेहता एबी फॉर्म दाखल करणार आहेत.
advertisement
उमरेड भाजपचेच...
भाजपने उमरेड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी देऊन उमरेड मध्ये भाजपचाच उमेदवार राहील हे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने काँग्रेसचे उमरेडचे तत्कालीन आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेत उमेदवारी दिली होती. मात्र, राजू पारवे निवडणुकीत पराभूत झाले. तेव्हापासून ते उमरेडमधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते.
तर दुसऱ्या बाजूला भाजपचे सुधीर पारवे या मतदारसंघातून इच्छुक होते. महायुतीच्या वाटाघाटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला ही जागा सुटावी यासाठी जोर लावला होता. मात्र, भाजपकडेच हा मतदारसंघ राहिला.
राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आह. आपल्या चौथ्या यादीत अजित पवार गटाने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. अजित पवारांनी ठाकरे गटाच्या नेत्याला संधी दिली आहे. चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भोरमधून शंकर मांडेकर आणि मोर्शीतून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.