जागा वाटपाच्या चर्चे दरम्यान अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केले. आम्ही तुम्हाला मु्ख्यमंत्रीपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, असे वक्तव्य शहा यांनी केले असल्याचे समोर आले. त्यानंतर आता या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
महायुतीमध्ये भाजप 155 ते 160 जागा लढवणार आहे. तर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना उर्वरित जागा मिळणार आहे. सध्या महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, शिवसेनेतून बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. आता, राज्यातील निवडणुका झाल्यानंतर भाजप नमतं घेणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
अमित शहा नेमकं काय म्हणाले होते?
‘या देशात पीएम, सीएम, प्रांत ही तीनच महत्त्वाची पदं आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती कामं पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला,’ असे सूचक विधान अमित शहा यांनी केले होते.
