आपल्या मराठा आरक्षण आंदोलकांचे उमेदवार जाहीर केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासोबत मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाच्या मतांची मोट बांधली आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून त्यांच्या बैठका सुरू होत्या. फक्त एकाच समाजाच्या मतांवर विजय मिळवता येणार नसल्याचे जरांगे यांनी आधी म्हटले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडणार असल्याचे जाहीर केल्याने आता विद्यमान आमदार गॅसवर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानामुळे राजकीय गणिते बदलली. आणखी कोणत्या मतदारसंघातील उमेदवार पाडायचे, याची यादीदेखील जरांगे पाटील लवकरच जाहीर
या मतदारसंघात उमेदवार पाडणार, कोणते आमदार गॅसवर?
गंगापूर - या मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब हे विद्यमान आमदार आहेत.
कन्नड - या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप नेते रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव ही शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे.
कळमनुरी - हिंगोली जिल्ह्यातील या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे आमदार आहेत.
गंगाखेड - छत्रपती संभाजीनगरमधील या मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गु्ट्टे हे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतविभागणीचा फायदा गुट्टे यांना झाला होता.
