विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीरनामा देण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी अजित पवारांनी म्हटले की, यावेळी आमच्या कुटुंबातून दोघेजण उभं राहिलो आहेत. काका पुतण्याची परंपरा कायम असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत मतदार राजाचा कौल मान्य करावा लागतो. मी माझ्या परीने माझी बाजू मांडत आहे तर, ते त्यांची बाजू मांडत आहेत. मतदार सूज्ञ असून ते योग्य कौल देतात. माझा अभिमन्यू झाला असं अजिबात वाटत नसून सगेसोयरे पण माझ्या बाजूने आहेत, असेही अजित पवारांनी म्हटले.
advertisement
लाडकी बहीण गेमचेंजर ठरेल का?
अजित पवारांनी म्हटले की, लाडकी बहीण योजना चांगली आहे. या योजनेला विरोध केला पण महिलांना ही बाब आवडत नसल्याचे लक्षात आल्यावर विरोधकांकडून विरोध बंद झाला. सध्या विरोधकांकडून योजना हाणून पाडण्यासाठी केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागात ही योजना गोरगरिबापर्यंत पोहोचली असल्याचा दावा अजित पवारांनी केला.
शरद पवारांच्या निवृत्तीची किंमत चुकवली...
मी त्याबद्दल खूप मोठी किंमत चुकवली आहे. मला व्हिलन म्हणून महाराष्ट्रातील जनतेनं ठरवलं आहे. अशा प्रकारचा प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेला होता. ते सगळं जाहीर केल्यानंतर दोन ते तीन दिवसातचं त्यांनी तो निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, उद्याला त्यांच्या मनात नक्की काय आहे महाराष्ट्रातील आजपर्यंत कोणालाच कळलेलं नाही, अगदी मी घरातला असलो तरी घरात sल्या व्यक्तीलाही कळलेलं नाही, असेही अजित पवारांनी म्हटले.
