TRENDING:

Maharashtra Elections Ajit Pawar : अजित पवारांची भावनिक साद, लोकसभेला तुम्ही साहेबांना खूश केलं, अन् आता...

Last Updated:

Maharashtra Elections : अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील गावे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळपासून अजित पवारांनी गाव भेट दौरा सुरू केला. यावेळी बोलताना अजित पवारांनी ग्रामस्थांना भावनिक साद घातली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत फुंडे, प्रतिनिधी, पुणे :  बारामती विधानसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार हे प्रचाराच्या शेवटच्या दिनी एकच सभा घेत मतदान करण्याचे आवाहन करायचे. यंदा मात्र, चित्र वेगळं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा क्षेत्रातून सुप्रिया सुळे यांना जवळपास 48 हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे अजित पवार काहीसे सावध झाल्याचे दिसून येते.
लोकसभेला तुम्ही साहेबांना खूश केलं, आता मला खूश करा, अजिदादांची भावनिक साद
लोकसभेला तुम्ही साहेबांना खूश केलं, आता मला खूश करा, अजिदादांची भावनिक साद
advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती ग्रामीण भागामध्ये गाव भेट दौरा करत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी आपल्या गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. बारामती मधील वंजारवाडी या गावी सकाळी सात वाजता गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी रुई गावात सभा घेतली. या सभेत अजित पवारांनी आपण भाजपसोबत का जाण्याचा निर्णय घेतला याचे स्पष्टीकरण दिले.

advertisement

अजितदादांचे भावनिक आवाहन...

अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्याचा दौरा करीत असून सावळे येथील एका सभेत बोलताना त्यांनी भावनिक आवाहन केले. अजित पवार यांनी म्हटले की, लोकसभेला तुम्ही पवार साहेबांचा वयाचा विचार करून मतदान केले. पवार साहेबांना तुम्ही खुश केलं. आता विधानसभा निवडणूक आहे आता मला खुश करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

advertisement

मी पक्ष चोरला नाही...

अजित पवारांनी सांगितले की, साहेब (शरद पवार) जर आले त्यांना सांगा. लोकसभेला आम्ही तुमचा मान राखलाय आणि हे काम करत आहे त्याला खुश करू. शेवटी तालुक्याचा विकास ते त्यांच्या पद्धतीने करतील माझ्या पद्धतीने करणार आहे. माझ्याबरोबर आमदार आले म्हणून पक्ष मला मिळाला आणि पक्षाचा मी आज प्रमुख झालो. तरीदेखील मला पक्ष चोरला असे म्हणतात, असे अजित पवारांनी म्हटले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबात सगळं काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. दिवाळीत दरवर्षी पाडव्यात पवार कुटुंब आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा देत असतं. मात्र, यंदा अजित पवारांनी वेगळी चूल मांडत गोविंदबागेऐवजी आपल्या काटेवाडीत कार्यकर्त्यांची भेट घेतली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Ajit Pawar : अजित पवारांची भावनिक साद, लोकसभेला तुम्ही साहेबांना खूश केलं, अन् आता...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल