विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया पार पडली आहे. उमेदवारांच्या अर्जाची पडताळणीची प्रक्रिया पार पडत आहे. आपल्या उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे उमेदवारांना आपल्या संपत्तीची आणि दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानुसार उमेदवारांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि संपत्तीची माहिती मतदारांसमोर येते.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे वरळीतून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे 3 लाख 90 हजार रुपये किंमतीचे 535 हिरे असलेले ब्रेसलेट आहे. त्यांच्याकडील एकूण सोने चांदीच्या दागिन्यांची किंमत 1 कोटी 99 लाख रुपये आहे.
advertisement
व्यवसाय काय? उत्पन्नाचे स्रोत काय?
आदित्य ठाकरे यांनी आपला व्यवसाय म्हणून सामाजिक आणि राजकीय सेवा हा व्यवसाय असल्याचे नमूद केले. आदित्य ठाकरे यांनी आपल्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये व्याज, भाडे, लाभांश आणि पगार असा उल्लेख केला आहे.
नोकरी कुठं करतात?
आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, उत्पन्न स्रोतात व्याज आणि पगार असा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांना व्याज, भाडे कशाचे मिळते, पगार कोणता आहे, याची माहिती सविस्तर केली नाही. आमदार म्हणून मिळणारे वेतन याचा उल्लेख आहे की इतर ठिकाणांहून त्यांना पगार मिळतो, याची चर्चा सध्या रंगली आहे.
>> आदित्य यांच्या प्रतिज्ञापत्रात काय?
- आदित्य ठाकरेंकडे 21 कोटींची संपत्ती
- 6.4 कोटींची स्थावर मालमत्ता
- 15.43 कोटींची जंगम मालमत्ता
- एक बीएमडब्ल्यू कार
- सोन्या चांदीचे दागिने 1 कोटी 90 लाख
- 37,344 रुपये रोख रक्कम
- बँकेत 2.8 कोटी रुपयांच्या ठेवी
- म्युच्युअल फंड आणि शेअर्समधील गुंतवणूक- 10 कोटी रुपये
- स्वत: घेतलेली संपत्ती- 3.27 कोटी रुपये
- वारसा हक्कातून आलेली संपत्ती- 2.7 कोटी रुपये
- कर्जतच्या भिसेगावमध्ये 171 स्क्वेअर मीटर जमीन
- रायगडमध्ये काही एकर जमीन, ज्याचं सध्याचं बाजारमूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये
- ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दुकानांचे दोन गाळे, ज्याचं बाजारमूल्य 4 कोटी 56 लाख रुपये
- बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये
- एलआयसी पॉलिसी- 21 लाख 55 हजार 741 रुपये
