प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रात वंचित आघाडीला जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला जातोय. समोर आलेल्या एक्जिट पोलच्या आकड्यावरुन प्रकाश आंबेडकरांना जागा मिळण अवघड झालंय, असा अंदाज आहे.
Maharashtra Exit Poll Result : भाजपच्या मिशन 45 चं स्वप्न भंगलं, उद्धव ठाकरेंनी लावला सुरुंग?
advertisement
लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यात मतदान पार पडलं. तर महाराष्ट्रात आधीच 20 मे रोजी 5 टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झालं आहे. आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीनेही कडवी झुंज दिली आहे.
महायुतीला 32 ते 35 जागा मिळणार असा अंदाज नेटवर्क 18 च्या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पक्षानुसार अंदाज पाहिला तर भाजपला 20-23 जागा मिळतील. तर काँग्रेसला 6/9 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाला सुद्धा याच प्रमाणात जागा मिळणार आहे.