Maharashtra Exit Poll Result : भाजपच्या मिशन 45 चं स्वप्न भंगलं, उद्धव ठाकरेंनी लावला सुरुंग?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही अग्निपरीक्षा ठरली आहे. भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन लोकसभेसाठी मिशन 45 साठी महाराष्ट्र पिंजून काढला. पण भाजपचं मिशन 45 फेल ठरलं आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही अग्निपरीक्षा ठरली आहे. भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन लोकसभेसाठी मिशन 45 साठी महाराष्ट्र पिंजून काढला. पण भाजपचं मिशन 45 फेल ठरलं आहे. महायुतीला महाराष्ट्रामध्ये 32 ते 35 जागांवर समाधान मानवे लागणार आहे. तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळणार असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यात मतदान पार पडलं. तर महाराष्ट्रात आधीच 20 मे रोजी 5 टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झालं आहे. आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीनेही कडवी झुंज दिली आहे.
advertisement
महायुतीला 32 ते 35 जागा मिळणार असा अंदाज नेटवर्क 18 च्या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पक्षानुसार अंदाज पाहिला तर भाजपला 20-23 जागा मिळतील. तर काँग्रेसला 6/9 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाला सुद्धा याच प्रमाणात जागा मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 01, 2024 7:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Exit Poll Result : भाजपच्या मिशन 45 चं स्वप्न भंगलं, उद्धव ठाकरेंनी लावला सुरुंग?