अमिताभनी स्टाफला दिली 10,000ची दिवाळी, भडकले नेटकरी; म्हणाले, 'जया असत्या तर...'
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Amitabh Bachhan Troll : बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील स्टाफ मेम्बर्सना दिवाळीनिमित्तानं गिफ्ट्स दिले. पण या गिफ्ट्समुळे बिग बींवरच ट्रोल होण्याची वेळ आली.
कोणताही भारतीय सण हा बॉलीवूड स्टारच्या घरी कायमच दमदार होत असतो. आत्ताच दिवाळी सण बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या घरी साजरा झाला. यावेळी अनेक कलाकार आपल्या घरातील स्टाफ मेम्बर्सना गिफ्ट दिले. ज्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या घरातील स्टाफ मेम्बर्सना गिफ्ट दिले. पण या गिफ्ट्समुळे बिग बींवरच ट्रोल होण्याची वेळ आली.
एका कंटेंट क्रिएटरच्या वायरल व्हीडिओमुळे अमिताभ यांना ट्रोलिंग सहन करावे लागले. अमिताभ यांच्या मुंबई जुहू ठिकाणी असलेल्या घरी एक कंटेंट क्रिएटर त्यांच्या स्टाफ सोबत बोलत होता. त्याच वेळी अमिताभ त्यांच्या स्टाफला स्वत: मिठाई देत होते. क्रिएटरने स्टाफला विचारले असता त्याला समजले की मिठाई सोबत 10000 रुपये कॅशही स्टाफला दिली होती. त्यानंतर त्या कंटेंट क्रिएटरने अमिताभ यांचे सजलेले घर दाखवले. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
advertisement
काय म्हणाले युजर्स
एका युजरने अमिताभ यांना ट्रोल करत लिहिले, 'नाव अमिताभचे आणि काम जयाचे असेल', दुसऱ्या युजरने लिहिले, 'यापेक्षा तर मला मिळाले आहेत, चांगले झाले अमिताभने दिले, जया असती तर 1001 आणि सोनपापडी दिली असती. इतके श्रीमंत असूनही फक्त 10000 रुपये दिले.'
advertisement
advertisement
अमिताभ यांचे येणारे चित्रपट
view commentsअमिताभ अजूनही 80 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. 'रामायण' आणि 'ब्रह्मास्त्र 2 हे आमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट आहेत. या सिनेमांप्रती प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याअगोदर अमिताभ हे साउथच्या 'वेट्टैयन' या चित्रपटात दिसले होते. सध्या ते 'कोण होणार करोडपती 17' हा शो होस्ट करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अमिताभनी स्टाफला दिली 10,000ची दिवाळी, भडकले नेटकरी; म्हणाले, 'जया असत्या तर...'


