कराडमध्ये राजकीय भूकंप! मैत्री तोडली, जनशक्ती आघाडीचा राष्ट्रवादीला रामराम; कोणत्या पक्षात जाणार?

Last Updated:

काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत असलेल्या जनशक्ती आघाडीचने भाजपात पक्षप्रवेश केला आहे.

Karad News
Karad News
सातारा : सध्या राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. भाजपने सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे ऑपरेशन लोट्स सुरु केले आहे. त्यांचे हे ऑपरेशन लोट्स यशस्वी झाले आहे. त्यानंतर आता कराडच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत असलेल्या जनशक्ती आघाडीचने भाजपात पक्षप्रवेश केला आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत धक्कादायक ठरत आहे.
साताऱ्यातील कराड नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली जनशक्ती विकास आघाडीच्या माजी दोन नगराध्यक्ष आणि सात नगरसेवकांनी आपल्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद वाढली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा एक धक्का मानला जात आहे.
advertisement

भारतीय जनता पक्षात कोणी कोणी प्रवेश केला?

  • अरुण जाधव
अध्यक्ष, जनशक्ती आघाडी व माजी नगरसेवक आणि कराड उत्तर विधानसभेचे 2004 चे अपक्ष उमेदवार
  • शारदाताई जाधव (पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा २००१ ते २००६, दुसऱ्यांदा नगराध्यक्षा २००९ ते २०११ ,
  • १९८५ पासून आजअखेर नगरसेवक, सन २०१६ ला बिनविरोध नगरसेविका)
  • अशोक भोसले ( माजी नगराध्यक्ष १९९८ ते ९९,  कराड नगपरिषद नगरसेवक १९९६ ते २००६
  • advertisement
  • अतुल शिंदे (उपाध्यक्ष, जनशक्ती आघाडी माजी नगरसेवक, कराड नगपरिषद
  • आशुतोष जयवंतराव जाधव (युवा नेते व माजी नगराध्यक्ष जयवंतराव जाधव यांचे चिरंजीव)
  • आनंदराव पालकर, माजी नगरसेवक
  • शिवाजीराव पवार, माजी नगरसेवक
  • चंदाराणी लुणीया, माजी नगरसेविका
  • विनायक विभुते, माजी नगरसेवक
  • अरुणा शिंदे, माजी नगरसेविका
  • भाजपचं बळ आणखी वाढलं

    दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.  भाजपाची नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बेरीज असल्याचे देखील म्हटले जात आहे. सातारा नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. साताऱ्यात भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. अशातच या पक्षप्रवेशामुळे भाजपचं बळ आणखी वाढलं आहे.
    advertisement

    हे ही वाचा :

    view comments
    मराठी बातम्या/Local Body Elections/
    कराडमध्ये राजकीय भूकंप! मैत्री तोडली, जनशक्ती आघाडीचा राष्ट्रवादीला रामराम; कोणत्या पक्षात जाणार?
    Next Article
    advertisement
    Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
    CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
    • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

    • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

    • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

    View All
    advertisement