ओबीसींसाठी समिती, बावनकुळेंकडे अध्यक्षपद, समितीत कोण कोण?
आपल्या एकाच रक्तातील नातेवाईकांचा प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्याचा उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी असल्याची नोंद आहे का ते तपासा.
स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येक नागरिकाची जन्म- मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जायची. पूर्वी त्या नोंदी करण्यासाठी दर महिन्याला तहसील कार्यालयामध्ये पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागामध्ये विलिन झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. रक्तनाते संबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावातल्या तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासा.
advertisement
मराठ्यांनी अंगावरचा गुलाल धुवायच्या आत OBC कोर्टात, मोठ्या घडामोडींना सुरुवात
आपल्या एकाच रक्तनाते संबंधातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा इतरत्र कोणत्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र तुम्ही काढून घेऊ शकता.
रक्तसंबंधातील जर नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत कार्यरत असल्यास त्यांच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर कार्यालयाकडून नातेवाइकाच्या कुणबी जातीची जर नोंद केलेली असेल तर त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.
मराठा आरक्षण GRरनंतर OBC नेत्यांची धावपळ, दिवसभरातील महत्त्वाच्या 5 घडामोडी
रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.
कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील- चुलते- आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते- आत्या, आजोबांचे चुलते- आत्या, पणजोबांचे चुलते- आत्या किंवा खापर पणजोबांचे चुलते- आत्या यांपैकी कोणत्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहेत.