रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगर परिषदेत भाजपचे उमेदवार संदीप भिसे हे एका मताने विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ७ अ मधून संदीप भिसे हे विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला संदीप भिसे यांच्यापेक्षा एक मत कमी पडले.
एका मतांनी जिंकल्यानंतर संदीप भिसे काय म्हणाले?
"शेवटी विजय तो विजय असतो. एक मताने काय आणि शंभर मतांनी काय. मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास मी सार्थ ठरवेन", असे भाजपचे संदीप भिसे यांनी विजयानंतर बोलताना सांगितले.
advertisement
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात होते. तर नगरसेवकपदासाठीच्या २८ जागांसाठी तब्बल ११० उमेदवार रिंगणात होते. चिपळूणची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
पुण्याच्या वडगाव मावळमध्येही अजितदादांचा उमेदवार एका मताने जिंकला
वडगाव मावळमध्ये अजित पवार यांच्या उमेदवाराने एका मताने बाजी मारली आहे. वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत हा पहिला निकाल हाती आला, तो ही केवळ एका मताने विजयी झाल्याचा.. त्यामुळे निकालाबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे या निवडून आल्या आहेत. त्या नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या. अवघ्या एका मताने त्यांनी निवडणूक जिंकली आहे. सुनीता ढोरे या प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांना एकूण ३२३ मतं मिळाली. त्यांनी भाजपच्या पूजा अतिश ढोरे यांना एक मताने हरवलं आहे.
