TRENDING:

मुनगंटीवार, दानवे, नितेश राणेंना धक्का, राजेश टोपे-रोहित पाटलांनाही दणका, होमग्राऊंडवर कुणाकुणाचा पराभव?

Last Updated:

Maharashtra Nagar Parishad Election Results: गृह जिल्ह्यात अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु जनतेने प्रस्थापितांना नाकारून नव्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींचे निकाल स्पष्ट झाले असून सर्वपक्षीय प्रस्थापित नेत्यांना अनेक ठिकाणी दणके बसले आहेत. गृह जिल्ह्यात अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु जनतेने प्रस्थापितांना नाकारून नव्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा सगळ्याच पक्षातील बहुतांश दिग्गज नेत्यांना आपापल्या जिल्ह्यात पराभवाचा फटका बसला आहे.
महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक निकाल
महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक निकाल
advertisement

कोणत्या नेत्यांना कुठे धक्का, कुणाचा पराभव?

१) भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का, मूल नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी

२) सावंतवाडी नगर परिषदेवर भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे. राज घराण्यातील श्रद्धाराजे भोसले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले आहेत. त्यामुळे दीपक केसरकर यांना मोठा धक्का मानला जातोय.

advertisement

३) संग्राम थोपटे आणि भाजपला भोरमध्ये मोठा धक्का, भोर नगराध्यक्ष राष्ट्रवादी विजयी. संग्राम थोपटे यांच्या भाजपचा पराभव.

४) कणकवलीत शहर विकास आघाडीचा विजय/ संदेश पारकर 150 मतांनी विजय, पालकमंत्री नितेश राणेंना धक्का

५) काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या गावातील नगरपंचायतीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. येथे शिवसेनेचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुजित पानतावने यांना मतदारांनी एकतर्फी कौल दिला.

advertisement

६) तासगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटलांना धक्का, माजी खासदार संजय काका पाटलांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी

७)वैजापूरमध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का, वैजापूर नगरपरिषदेमधून भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी विजयी, स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांना झटका

८) धरणगाव नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का, ठाकरे शिवसेनेच्या लिलाबाई सुरेश चौधरी विजयी

advertisement

९) आमदार प्रशांत बंब यांना गंगापूरमध्ये मोठा धक्का, आमदार सतीश चव्हाण यांनी मारली बाजी

१०) फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का, आमदार अनुराधाताई चव्हाण, मंत्री अतुल सावे यांना धक्का ठाकरे गटाचे उमेदवार विजयी

११) भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंना धक्का, अंबडमध्ये राजेश टोपेंना, तर परतूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांना धक्का

१२) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण आणि कणकवली नगर परिषदेत नितेश राणे यांना धक्का, नीलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने भगवा फडकवला

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांसाठी खुला झाला दुर्मिळ नाण्यांचा खजिना, पाहण्यासाठी तुफान गर्दी, Video
सर्व पहा

जालन्यातील ३ नगर परिषदांपैकी २ नगर परिषदेवर भाजपने झेंडा फडकावलाय. परतूरमध्ये आधी काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगर परिषद आता भाजपने ताब्यात घेतलीय. या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियांका राक्षे विजयी झाल्या आहेत. तर अंबडमध्ये भाजपने सत्ता राखलीय. या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी झाल्या आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुनगंटीवार, दानवे, नितेश राणेंना धक्का, राजेश टोपे-रोहित पाटलांनाही दणका, होमग्राऊंडवर कुणाकुणाचा पराभव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल