TRENDING:

Marathi : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचं एकमत! आंदोलनाच्या भूमिकेत, 6 जुलैला मोर्चाची हाक

Last Updated:

Maharashtra Oppose Hindi Imposition : दी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून सध्या तीव्र राजकीय घडामोडी सुरू आहेत. हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार, मराठी माणूस या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. तर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंमध्ये एकमत झाले असले तरी आंदोलनाच्या वाटा वेगळ्या दिसत असल्याचे चित्र आहे.
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आंदोलनाच्या मैदानात, 6 जुलै रोजी मोर्चाची राज ठाकरेंची हाक
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आंदोलनाच्या मैदानात, 6 जुलै रोजी मोर्चाची राज ठाकरेंची हाक
advertisement

राज्यातील शालेय शिक्षणात 'त्रिभाषा सूत्रा'नुसार पहिलीपासून हिंदींच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या वादावर आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी भेट घेतली. या बैठकीत शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

advertisement

राज ठाकरे यांनी म्हटले की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदीची सक्ती मान्य नाही. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्यांची भूमिका मांडली. पण त्यांची ही भूमिका मी फेटाळून लावली. याउलट सरकारच्या धोरणावर मी उपस्थित केलेल्या मुद्यावर त्यांना उत्तर देता आले नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.

राज यांच्याकडून आंदोलनाची हाक....

राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मराठी भाषेसाठी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. हा मोर्चा मराठी माणसाचा असणार आहे. या मोर्चाला कोणताही नेता नसणार, कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसणार. मराठी माणूसच या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. या आंदोलनात विद्यार्थी, पालक यांच्यासह मराठी माणसाला मोठ्या संख्येने सहभागी होता यावे, यासाठी रविवारचा दिवस निवडला असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी इतर सगळ्या राजकीय पक्षासोबत आमच्याकडून संवाद साधला जाईल, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

advertisement

मोर्चात कोण येणार आणि कोण नाही हे मी बघणार...

मोर्चात कोण येणार आणि कोण नाही हे मी बघणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मराठीसाठी अनेकजण बोलतात. मात्र, प्रत्यक्ष मैदानात कोण उतरणार, हे मी पाहणार असल्याचे राज यांनी सांगितले. मराठीसाठीच्या मोर्चात सगळ्याच घटकातील मराठी प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन राज यांनी केले.

advertisement

मराठीसाठी आणखी एक आंदोलन...

मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीच्यावतीने 7 जुलै रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हुतात्मा चौकातून हुतात्म्यांना अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

29 जून रोजी याच समन्वय समितीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेलाही पाठिंबा ठाकरे गटाने पाठिंबा दिला असून उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathi : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचं एकमत! आंदोलनाच्या भूमिकेत, 6 जुलैला मोर्चाची हाक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल