TRENDING:

BJP : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचा धमाका, उत्तर महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांच्या हाती कमळ

Last Updated:

Maharashtra Politics : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप विरोधकांना धक्का देणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील दोन बडे नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप विरोधकांना धक्का देणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील दोन बडे नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचा धमाका, उत्तर महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांच्या हाती कमळ
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचा धमाका, उत्तर महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांच्या हाती कमळ
advertisement

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातही दणदणीत यश मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यातूनच आता अनेक स्थानिक नेत्यांसह बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. धुळे जिल्ह्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे हे येत्या दोन दिवसांत अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

advertisement

अपूर्व हिरे हे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार असून त्यांनी 2019 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नव्हतं, मात्र त्यावेळी हिरे कुटुंबीयांमध्ये मतभेद स्पष्ट झाले होते. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध दाखवला होता. आता मात्र, त्यांनी अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

advertisement

दुसरीकडे काँग्रेसच्या मजबूत नेतृत्वात गणल्या जाणाऱ्या कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश हा पक्षासाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकतो. कुणाल पाटील हे धुळे-नंदुरबार सह उत्तर महाराष्ट्रात ओळखला जाणारा चेहरा आहेत. त्यांच्यावर आजवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, हीच त्यांची प्रमुख सकारात्मक बाब असून त्यामुळेच भाजपने त्यांना पक्षात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

आगामी निवडणुकांसाठी भाजपने उत्तर महाराष्ट्रात दमदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस व इतर विरोधकांचे बुरुज ढासळण्याची चिन्हं दिसत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचा धमाका, उत्तर महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांच्या हाती कमळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल