शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिनमधील जेवणाच्या दर्जावरून कँटिन कर्मचार्यांना मारहाण केली. त्यावेळी संजय गायकवाड हे टॉवेल आणि बनियानवर आले होते. त्यानंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत संजय शिरसाट हे बनियावर दिसून आले.
Virodhak Chaddi Baniyan Protest : विधानभवनात विरोधक आक्रमक, बनियन, टॉवल गुंडाळत आंदोलन
advertisement
विरोधकांच्या बॅनरवर शिंदे गटाचे दोन्ही संजय...
या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सतेज पाटील, सचिन अहिर, महेश सावंत आदी नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो असा या बॅनरवरती उल्लेख करण्यात आला होता, तर बाजूलाच संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो दिसून आला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video : शिंदे गटाला डिवचलं, बनियन-टॉवेलवर विरोधी पक्षाचे आंदोलन, मविआ आक्रमक