शरद पवार साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी लाडकी बहीणवर बोलताना शरद पवार म्हणाले की, दोन कोटीहून अधिक महिलांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल, असे शरद पवारांनी म्हटलं आहे. पण असं झालं तरी राज्यात 67 हजार अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. आणि 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्याचे वास्तव शरद पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मुद्दा महिलांवरील गुन्हेगारीचा मुद्दा सरकारला भारी पडू शकतो. तसेच राष्ट्रवादीला किती जागा मिळतील? असा सवाल पत्रकारांनी केला असता, शरद पवार म्हणाले, मी ज्योतिषी नाही.
advertisement
तसेच या निवडणुकीत सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी लोकसभेची निवडणूक गमावल्यामुळे विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. पण राज्यात लोकांना परिवर्तन हवंय आणि यावेळी परिवर्तन होईल.महाविकास आघाडीच्या पाठीशी लोक उभे राहतील असं माझं ऑब्झर्वेशन असल्याचा दावाही शरद पवारांनी केला.
युगेंद्र पवारांसाठी प्रतिभा पवार प्रचार करत आहे. या प्रचारावर अजित पवारांनी निवडणुकीनंतर त्यांना प्रश्न विचारणार असल्याचं विधान केलं आहे. यावर शरद पवार म्हणाले, नातवाच्या प्रचाराला प्रतिभा काकी बाहेर पडल्या त्याप्रमाणे माझ्या प्रचारासाठी नाही पण याआधी सुद्धा इतर घरातल्यांच्या सदस्यांच्या प्रचारासाठी त्या बाहेर पडल्या आहेत, असे उत्तर त्यांनी अजित पवारांना दिलं आहे.