याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई नाका इथं मंगळवारी दुपारी १२ वाजता वसंत गीते यांच्या कार्यालयात भगवानसिंह चव्हाण हा परप्रांतीय तरुण आला.तेव्हा तरुणाने मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून देतो. १० मतांपैकी ३-४ मते तुम्हाला मिळवून देऊन निवडणुकीत जिंकून देतो. या बदल्यात ४२ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यातले ५ लाख आता द्या अशीही मागणी तरुणाने केली.
advertisement
तरुणाला पैसे देण्यास वसंत गीते यांच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. तेव्हा तरुणाने पैसे न दिल्यास प्रोग्रॅमिंग करणारे माझ्या ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमचाच पराभव करेन अशी धमकी दिली. त्याने स्वत:चा पत्ताही पदाधिकाऱ्यांना दिला. पदाधिकाऱ्यांनी यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याची अधिक चौकशी केली. यात भगवानसिंगने आपण निवडणुकीत पैसे कमावण्याची संधी म्हणून हा प्रकार केला असं कबूल केलं. दोन तीन आठवड्यापूर्वीच कामानिमित्त तो शहरात आला होता.
