Uddhav Thackeary: 'ओ देवाभाऊ, जाऊ तिथे खाऊ,मग शिंदेंना का सोबत घेतलं? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना तिखट सवाल
- Published by:sachin Salve
Last Updated:
' देवेंद्र फडणवीस लगेच बोलले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सहनच होत नाही. त्यांनी भ्रष्टाचार करून एक पुतळा उभारला होता'
मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण करत महायुतीवर जोरदार प्रहार केला.
'आपले सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार अशी मी घोषणा केली होती. पण देवेंद्र फडणवीस लगेच बोलले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सहनच होत नाही. त्यांनी भ्रष्टाचार करून एक पुतळा उभारला होता. तो पाडून त्यांनी महाराजांचा अपमान केला. त्यांच्या अंगाची लाही लाही होते. त्यांनी मला आव्हान दिलं की, मुंब्रात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवा.
advertisement
ओ देवा भाऊ, जाऊ तिथे खाऊ, आधी मुंब्य्रात जाऊन पाहा. तिथे कमानीवर शिवाजी महाराजांचे शिल्प आहे. जिजाऊ आहे, तुकाराम महाराज आहे. सावित्रीबाई फुले यांचे पुतळे मुंब्र्यात आहे. पण, मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यात येतो. त्यातला पालकमंत्री तुम्ही फोडला आणि डोक्यावर बसवला. त्याच्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवता येत नसेल तर त्यांना डोक्यावर घेऊन का नाचला, उगाच आम्हाला बोगस आव्हानं देऊ नका, असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना प्रतिसवाल केला.
advertisement
तरुणांना 4 हजार रुपये देणार!
view commentsआपल्याला कळत नाही आपला खिसा कसा, मारला जात आहे. महिलांची लाडकी बहीण योजना सुरूच नाही ठेवणार तर ती वाढवूं. आम्ही हवेत बोलत नाही. महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये देणार आहोत. शेतकाऱ्यांचं कर्ज हे 3 लाखांपर्यंत माफ करून दाखवला आहे. तरूण अनेक आहेत, काहीना शिकायचं आहे. जसे मुलींना मोफत देत आहोत. तसंच मुलांना मोफत शिक्षण द्यावे लागणार आहे. बेरोजगार तरुणांना उज्ज्वल भविष्यासाठी 4 हजार रुपये देणार आहोत, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 06, 2024 9:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeary: 'ओ देवाभाऊ, जाऊ तिथे खाऊ,मग शिंदेंना का सोबत घेतलं? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना तिखट सवाल









