Asia Cup : शेवटच्या ओव्हरमध्ये फोर मारून पाकिस्तानला रडवलं, तो कोच बनताच भारत फायनल हारला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचे जे कोचे होते ऋषिकेश कानिटकर यांनी 1998 साली फोर मारून पाकिस्तानचा पराभव केला होता. आज तोच खेळाडू भारताचा कोच असताना पाकिस्तानसमोर टीम इंडिया हारली आहे.
India vs Pakistan : अंडर 19 आशिया कपच्या फायनल सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह पाकिस्तानने दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे जे कोचे होते ऋषिकेश कानिटकर यांनी 1998 साली फोर मारून पाकिस्तानचा पराभव केला होता. आज तोच खेळाडू भारताचा कोच असताना पाकिस्तानसमोर टीम इंडिया हारली आहे.त्यामुळे टीम इंडियाची प्रचंड नाचक्की झाली आहे.
advertisement
खरं तर अंडर 19 आशिया कप स्पर्धेसाठी ऋषिकेश कानिटकर यांना भारताचा मुख्य कोच बनवण्यात आले होते. ऋषिकेश कानिटकर हे तेच आहेत ज्यांनी 18 जानेवारी 1998 ला पाकिस्तानचा ढाकाच्या मैदानावर पराभव केला होता. त्यावेळी सिल्व्हर जुबिली इंडिपेडन्स कप ही स्पर्धा खेळवली जात होती.या स्पर्धेत ऋषिकेश कानिटकर यांनी फोर मारून भारताचा सामना जिंकून दिला होता. तर पाकिस्तानचा पराभव झाला होता.
advertisement
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 48 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 314 धावा ठोकल्या होत्या. यावेळी भारताकडून या लक्ष्याचा पाठलाग सूरू असताना सक्वेन मुश्ताक शेवटची ओव्हर घेऊन आला होता.या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये भारताला 3 धावांची आवषश्यकता होती.त्यावेळी कानिटकर यांनी मिड-विकेटवर चौकार मारून भारताने 3 विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. विशेष म्हणजे हा सामना जिंकून भारताने ODI मधील सर्वोच्च यशस्वी लक्ष्याचा पाठलागाचा विक्रम केला होता.
advertisement
कसा रंगला सामना
अंडर 19 आशिया कप 2025 च्या फायनल सामन्यात पाकिस्ताने भारताचा 191 इतक्या मोठ्या धावाच्या फरकाने पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली होती.भारताचे दोन्ही सलामीवीर वैभव सुर्यवंशी 26 तर आयुष म्हात्रे 2 धावांवर बाद झाला होते.हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर इतर खेळाडूंनी भारताचा डाव सावरला नाही. आणि भारताचा डाव गडगडत गेला आणि पुढे जाऊन 130 धावांवर ऑल आऊट झाला. पाकिस्तानकडून अली रझाने 3, मोहम्मद सयाम, अब्दुल सुभान, हुझेफा अहसनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 347 धावा ठोकल्या होत्या. पाकिस्तानकडून समीन मिन्हासने 172 धावांची वादळी खेळी केली होती.मिन्हास व्यतिरीक्त अहमद हुसेनने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या बळावर पाकिस्तानने 347 धावा केल्या होत्या.दरम्यान भारताने हा आशिया कप हारल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचे आशिया कपवर एकहाती वर्चस्व होतं. या वर्चस्वाला देखील धक्का बसला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 6:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : शेवटच्या ओव्हरमध्ये फोर मारून पाकिस्तानला रडवलं, तो कोच बनताच भारत फायनल हारला










