मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती.
ती मुदत आता संपली त्यानंतर सगळ्यांच्या नजरा मुंबई पोलिसांकडे लागल्या होत्या. पोलीस आंदोलनाला दिलेल्या परवानगीची मुदत वाढवणार का? पोलिसांनी परवानगी नाकारल्यास जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी आणखी एक दिवस आंदोलनाला परवानगी देत काही अटीशर्ती घातल्या आहेत.
advertisement
आमच्याकडे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आझाद मैदानावर सुरु ठेवण्यासाठी परवानगी मागितली आहे आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याच्या चौकटीत त्यांची मागणी बसते का याबाबत विचार करत असून कायदेपंडितांकडून त्याबाबत माहिती घेत आहोत, असे मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती म्हणाले होते. त्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांची आंदोलकांना आवाहन
मुंबई पोलिसांनी उद्या मनोज जरांगेंच्यै आंदोलनाला परवानगी दिली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी आंदोलकांना विनंती केली आहे. आझाद मैदान, CSMR BMC परीसरातील गाड्या पार्किंगमध्ये नेण्याची करणार विनंती मुंबई पोलिसांनी केली आहे. आंदोलकांनी आझाद मैदान सोडून इतरत्र जावू नये यामुळे पोलिसांवर आणि पर्यायाने परिसरावर ताण येतोय. आजच्या आंदोलनामुळे मुंबईत कामाकरता अनेकांना येता आले नाही तसंच जे आले त्यांना खूप वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबईकरांना मुंबईत कामाला येणा-यांना त्रास होऊ नये, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही : मनोज जरांगे
27 तारखेपासून जालन्यातील अंतरलवाली सराट्यातून निघालेला भव्य मोर्चा आज सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालं. दरम्यान, उपोषणस्थळी दाखल होताच मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी यावेळी दिला. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हटायचं नाही हलायचं नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असंही जरांगे म्हणालेत. सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला.
