निकालावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. पण आरक्षणासाठी तुम्हाला गुडघ्यावर टेकवणार. एका जातीवर शक्य नव्हतं म्हणून आम्ही बाजूला झालो. सत्ता कुणाचीही आली तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देताना म्हटलं की, मराठा आरक्षण सरकारनं लवकर द्यावं, यात बेईमानी करायची नाही. मी आणि मराठा समाज मैदानात नव्हतो. सरकारला जाहीरपणे सांगतो की मराठा आरक्षण द्यायचं नसेल तर पुन्हा छाताडावर बसणार. आम्ही सामूहिक उपोषणाला बसणार आहोत.
advertisement
जरांगे फॅक्टरवरही मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील म्हणाले की, जरांगे फॅक्टर चालला नाही काय तुमची बुद्धी? कशाचा अभ्यास करता तुम्ही? जरांगे फॅक्टरचा अभ्यास करायला तुमची हयात जाईल. मराठ्यांचे दोनशे चार झाले आहेत. मराठ्यांच्या फॅक्टरची भिती होती म्हणून पक्षांनी मराठ्यांनाच तिकीट दिलं होतं.
आमचा कोणत्याच उमेदवारावर राग नाही. एकदा शब्द तोंडातून सुटला. या राज्यात मराठेच बाप ठरले आहेत. मराठ्यांच्या मताशीवाय या राज्यात कुणीच सत्तेत येवू शकत नाही. बघा आता मराठ्यांची कशी लाट येते. मैदानात आम्ही असतो तर एक शिक्का काम केलं असतं. आता आंदोलन पुकारु द्या सगळे एका बाजूला दिसतील.
