मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं मागच्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. आज आंदोलनाचा चौथा दिवस उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईतील गर्दी कमी कऱण्याचे आदेश दिले आहे. तसंच, मराठा बांधवांना मुंबईच्या बाहेर थांबवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे आंदोलकांनी पाणी घेण्याचं आवाहन केलं होतं. या सगळ्या आंदोलनाचे आजचे अपडेट्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत.