नवीन मारुती e Vitara ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये झलक दाखवण्यात आली होती. त्यानंतर e Vitara कधी लाँच होणार अशी चर्चा रंगली होती. अखेरीस मारुती सुझुकीने e Vitara वरून पडदा बाजूला केला आहे. लाँच होण्यापूर्वीच, या कारसाठी बाजारात बरीच चर्चा निर्माण झाली आहे. याचं मोठं कारण म्हणजे, ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. टाटा आणि महिंद्रा सारख्या ब्रँडने भारतात खूप मोठा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ तयार केला आहे.
advertisement
दोन बॅटरी पॅक
e Vitara मध्ये दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येणार आहे. ६१.१kWh आणि ४८.८kWh. एकाच इलेक्ट्रिक मोटरसह दोन्ही पर्याय एकाच चार्जवर ५०० किमीची रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय, डीसी फास्ट चार्जरद्वारे बॅटरी ५० मिनिटांत शून्य ते ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते.
3 व्हेरियंटमध्ये e Vitara
e Vitara 2025 ही डेल्टा, झेटा आणि अल्फा या 3 व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. ग्राहक १० रंगांच्या श्रेणीतून निवडू शकतात, ज्यामध्ये ओप्युलेंट रेड, ब्लूश ब्लॅक, आर्कटिक व्हाइट, ग्रँडिअर ग्रे, स्प्लेंडिड सिल्व्हर, नेक्सा ब्लू आणि ड्युअल-टोन शेड्स जसे की लँड ब्रीझ ग्रीन, स्प्लेंडिड सिल्व्हर, ओप्युलेंट रेड आणि आर्कटिक व्हाइट यांचा समावेश आहे. सर्व व्हेरिएंटमध्ये निळ्या काळ्या रंगाचे छत मिळणार आहे.
फिचर्स काय?
e Vitara 2025 मध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, इलेक्ट्रिक सनरूफ, एडीएएस सूट, ३६०-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस मोबाइल चार्जर, ड्राइव्ह मोड, सात एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल १०-इंच स्क्रीन, १८-इंच अलॉय व्हील्स, फॉग लाईट्स आणि थ्री-पॉइंट एलईडी डीआरएल आणि टेललाईट्स यांचा समावेश असेल.
किंमत किती असेल?
e Vitara 2025 च्या किंमतीबद्दल कंपनीने अद्याप या कारची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. e Vitara 2025 ची किंमत पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर केली जाईल. मात्र, किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, २० लाख ते २५ लाखांच्या किंमतीमध्ये ही SUV विकत घेता येईल.