मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी पावसकर हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. उपेंद्र पावसकर याने गुन्हा केल्याचे त्याने कबूल केला. आरोपी उपेंद्र पावसकर हा हा मानसिकदृष्ट्या अस्थिर, विक्षिप्त प्रवृत्तीचा असून, तो गेल्या तीन वर्षांपासून कुटुंबापासून दूर, प्रभादेवीत एकटाच राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
कुटुंबाशी सतत वाद, मारहाणीचे प्रकार...
advertisement
शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, पावसकर याचे कुटुंबीयांशी सतत वाद व्हायचे. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या घरच्यांवर शारीरिक हल्ले देखील करायचा. या कारणामुळे कुटुंबीयांनी त्याच्याशी संबंध तोडले होते. परिणामी तो प्रभादेवी येथे एकटाच राहत होता. या काळात त्याच्याविषयी शेजाऱ्यांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या.
प्रभादेवीतून ताब्यात
पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास प्रभादेवी येथून उपेंद्र पावसकरला ताब्यात घेतले. तो गेल्या तीन वर्षांपासून तेथे एकटाच वास्तव्यास होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग का उडवला?
पावसकर याचा त्याच्या कुटुंबात संपत्तीचा वाद सुरू होता. या वादात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पावसकरने केला होता. दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जबाब नोंदवल्यानंतर पोलिस अधिक तपास करत आहेत.