या संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत वाहन चालकाकडे जर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसेल तर त्याला पेट्रोल पंपावर इंधन दिले जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.
सरनाईक यांच्या खात्याचा नेमका निर्णय काय?
राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून) जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध आहे का नाही हे समजेल! जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही.
advertisement
तसेच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रला युनिक आयडेंटी (UID)असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते. त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पडदाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने धडक मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या.