TRENDING:

भावाकडून कला केंद्रात गोळीबार, वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार शंकर मांडेकरांना रडू कोसळले

Last Updated:

Shankar Mandekar: दौंड तालुक्यातील यवत वाखारी येथील कला केंद्रात आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने गोळीबार केला होता. याच पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या कार्यक्रमात शंकर मांडेकर यांनी वारकरी समाजाची माफी मागितली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी, भोर : मी माळकरी नाही पण वारकऱ्यांनी आणि माळकऱ्यांनी माझ्यावर एखाद्या साधु संताप्रमाणे प्रेम केलं, याची जाणीव मला आहे. माझ्या भावाकडून काही गेल्या महिन्यात चूक झाली. आम्हाला माफ करा, पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही, असे म्हणत वाढदिवसाच्या कार्यक्रमात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांना अश्रू अनावर झाले.
शंकर मांडेकर (आमदार)
शंकर मांडेकर (आमदार)
advertisement

दौंड तालुक्यातील यवत वाखारी येथील कला केंद्रात आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने गोळीबार केला होता. या प्रकरणात मांडेकर यांच्या भावाला अटक झाली होती. गोळीबार प्रकरणात आमदार मांडेकर यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. याच पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या कार्यक्रमात शंकर मांडेकर यांनी वारकरी समाजाची माफी मागितली.

अन् बोलता बोलता शंकर मांडेकर यांना अश्रू अनावर झाले...

advertisement

शंकर मांडेकर म्हणाले, माझ्या कुटुंबातील सगळे सदस्य इथे आहेत. कैलास मांडेकर यांचे नाव घ्यायला मी मुद्दाम मागे ठेवले. कारण काही काळापूर्वी एक चुकीची घटना घडली. त्यानंतर पत्रकारांनी मला घेरले आणि विचारले की तुम्ही टोपी घालून समाजकारण आणि राजकारण करता. तुम्ही स्वतःला वारकरी समजता, मग हे कसं घडलं? मी सांगू इच्छितो की मी वारकरी नाही पण वारकऱ्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझी श्रद्धा वारकऱ्यांवर आहे. जे चुकीचं घडलंय, त्याला काय शासन द्यायचे ते माझे वारकरी देतील. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, ज्याने चुकीचं काम केलं तो त्याचं बघेल, तुम्ही तुमचं काम करा.

advertisement

मी संपूर्ण वारकऱ्यांची माफी मागतो, ज्यांनी चुकी केली, त्याचा त्रास त्यांना (भावाला) होतोय आणि त्या चुकीची फळं त्यांना मिळत आहेत. माझे जे भावंड आहेत ते समाजामध्ये माझे प्रतिनिधी म्हणून काम करतात. मला या गोष्टीचं वाईट वाटत आहे.... असं म्हणत शंकर मांडेकर यांना अश्रू अनावर झाले.

माझ्या भावाकडून चूक झाली, पुन्हा अशी चूक होणार नाही

advertisement

समाजात काम करत असताना मी कधीच चुकीचे पाऊल टाकणार नाही. चुकीचं काम करतात, त्यांना मुळासकट उपटून टाकलं पाहिजे. कारण ही समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड नष्ट करण्याचे काम मी करत आहे. मी वारकरी संप्रदायाला जाहीर सांगतो, वारकऱ्यांना कधी कमीपणा येईल असे मी वागणार नाही. माझ्या भावाची चूक झाली मात्र भविष्यात अशी चूक होणार नाही, याची मी काळजी घेईल, असा विश्वास मी वारकऱ्यांना देतो, असे शंकर मांडेकर म्हणाले.

advertisement

शंकर मांडेकर यांनी अजित पवार यांचे आभार मानले

घटनेनंतर तणावाच्या कालावधीमध्ये वारकऱ्यांसोबत मला काही नेत्यांची साथ लाभली. विरोधकांनी टीका केली मात्र आमच्या नेत्यांनी (अजित पवार) यांनी स्पष्ट सांगितले की मांडेकरांची चूक नसेल मी त्यांना दोषी धरणार नाही. ही नेत्यांनी मला दिलेली ताकद आहे. याची जाण ठेवूनच आगामी काळात माझे काम सुरू राहिल, असे म्हणत शंकर मांडेकर यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांचे आभार मानले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भावाकडून कला केंद्रात गोळीबार, वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार शंकर मांडेकरांना रडू कोसळले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल