TRENDING:

राजकारणातून निवृत्तीच्या चर्चा, SRA प्रकल्पासंबंधी सनसनाटी आरोप, मोहित कंबोज यांचे वर्षा गायकवाड यांना चॅलेंज

Last Updated:

Mohit Kamboj: काँग्रेस नेत्या, खासदार वर्षा गायकवाड यांनी मोहित कंबोज यांनी एसआरए प्रकल्पांच्या कंत्राटांवरून घेरले. या सगळ्या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी मोहित कंबोज यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर आणि त्यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अनेक आरोप होत असताना स्पष्टीकरण देण्यासाठी मोहित कंबोज अखेर माध्यमांसमोर आले आहेत. माझ्या नावाची मुद्दाम बदनामी केली जात असल्याचे सांगत माझ्यावर आरोप करताना पुरावे द्यावेत नाहीतर विरोधकांनी राजकारणातून बाजूला व्हावे, असे आव्हान मोहित कंबोज यांनी दिले.
मोहित कंबोज भारतीय
मोहित कंबोज भारतीय
advertisement

मोहित कंबोज यांना झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे अनेक कंत्राटे मिळाल्याने तसेच गेल्या काही वर्षांत अनेकानेक वादात अडकल्याने सक्रीय राजकारणातून कंबोज बाजूला झाले आहेत, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. त्यानंतर कंबोज यांच्या राजकीय कारकीर्दीची जोरदार चर्चा झाली. एवढ्या कमी कालावधीत राजकारण करून शेकडो कोटींची माया जमविणारे कंबोज राजकारणापासून दूर का गेले, अशी चर्चा समाज माध्यमांवर होती. तसेच काँग्रेस नेत्या, खासदार वर्षा गायकवाड यांनीही कंबोज यांनी एसआरए प्रकल्पाच्या कंत्राटांवरून घेरले. या सगळ्या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

advertisement

मी राजकारणातून बाजूला झालो हे वृत्त खोडसाळपणाचे

मी राजकारणातून बाहेर पडलो, अशा बातम्या समाज माध्यमांवर तसेच मुख्य माध्यमांतही सुरू आहेत. पण मी कुणालाही अधिकृतपणे राजकारणातून बाहेर पडलो, असे सांगितले नाही. सक्रीय राजकारणात निवृत्त झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगत कुणीतरी खोडसाळपणे तसे वृत्त छापले आहे, असे मोहित कंबोज म्हणाले.

मोहित कंबोज यांचे वर्षा गायकवाड यांना चॅलेंज

advertisement

मोहित कंबोज यांना शासनाने 30 एसआरए प्रकल्प दिल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला. त्यावर बोलताना कंबोज म्हणाले, यापैकी कोणतेही पुरावे त्या सादर करू शकलेल्या नाहीत. वर्षा गायकवाड यांना विनंती आहे की असे कोणते ३० प्रकल्प शासनाने मला दिले याची अधिकृत माहिती जाहीर करा. जर जाहीर करणार नसाल तर तुम्ही राजकारणातून निवृत्त व्हा, असे आव्हान कंबोज यांनी दिले.

advertisement

माझ्या कंपनीची विनाकारण बदनामी करू नका- कंबोज

माझ्यावर खोटे आरोप करून अनेकांना मोठे व्हायचे आहे. पण त्या सर्वांना मला सांगायचे आहे की माझ्या कंपनीची विनाकारण बदनामी करू नये. तुमच्याकडे अधिकृत माहिती असेल तर मला पाठवा. मग आपण चर्चा करू, असे कंबोज म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चा, SRA प्रकल्पासंबंधी सनसनाटी आरोप, मोहित कंबोज यांचे वर्षा गायकवाड यांना चॅलेंज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल