दक्षिणेकडील राज्यात आणि गुजरातमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रातील डिप डिप्रेशन उत्तर पूर्वेच्या दिशेनं पुढे सरकत आहे. मुंबईहून ६२० किमी अंतरावर खोल समुद्रात हे डिप डिप्रेशन तयार झालं आहे. मात्र त्यामुळे अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट आलं आहे.
advertisement
सायक्लोनिक सर्क्युलेशनचाही उत्तरेकडे धोका
उत्तरेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. अरबी समुद्रात डिप डिप्रेशन तयार झालं आहे. ज्याची टर्फ लाइन महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून उत्तरेच्या दिशेनं जात आहे. तर पश्चिम बंगालच्या खाडीत मोंथा चक्रीवादळ धुमाकूळ घालत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे हे बदलणारे वारे आहेत.
महाराष्ट्रात मागच्या २४ तासात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस राहणार आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण विदर्भात पाऊस मुसळधार पाऊस राहील उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल.
विदर्भात ऑरेंज अलर्ट, कोकणात काय स्थिती?
29 ऑक्टोबर रोजी विदर्भात अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राशेजारील राज्यांमध्ये रेड अलर्ट चक्रीवादळामुळे असेल. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. 30 ऑक्टोबर रोजी देखील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पाऊस राहणार आहे. गुजरातमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१ नोव्हेंबरपर्यंत पाऊस
३१ आणि 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र चक्रीवादळ आणि डिप डिप्रेशनमुळे वारे कसे आणि कुठल्या दिशेनं फिरतात यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे तूर्तास तरी ३१ ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहणार आहे. त्यानंतर कडाक्याची थंडी येईल अशी शक्यता आहे. ला निनामुळे प्रशांत महासागरातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. मागच्या 25 वर्षांत जेवढी थंडी पडली नाही तेवढी यंदा राहील असा प्राथमिक अंदाज आहे.
