TRENDING:

आईच्या डोक्यात लेकाने घातली कुऱ्हाड, जीव जाईपर्यंत तसाच होता उभा, नंतर पळत गेला आणि.., गोंदिया हादरलं

Last Updated:

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला या गावात हत्या आणि आत्महत्येची विचित्र घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(गोंदियातील घटना)
(गोंदियातील घटना)
advertisement

गोंदिया : राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे गोंदियामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या आईची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर या मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे गोंदियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला या गावात हत्या आणि आत्महत्येची विचित्र घटना समोर आली आहे. मृतक आईचे नाव सुलकनबाई बनोठे (वय 75) तर लेखराज बनोठे (वय 54) असं आरोपी मृतक मुलाचे नाव आहे. सुलकनबाई बनोठे आणि तिचा मुलगा लेखराज बनोठे हे एकत्र राहत होते. दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध आईकडे दारूसाठी पैसे मागितले आईने तिने पैसे न दिल्याने आईवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. नंतर आरोपी मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

advertisement

अधिक माहिती अशी की, लेखराज बनोठे हा दारूच्या आहारी गेला होता. रात्री लेखराज बनोठे याने आई सुलकनबाई हिला दारू पिण्याकरिता पैसे मागितले. आईने पैसे न दिल्याने मुलाने रागाच्या भरात आईवर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. यात सुलकनबाई गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ते पाहून लेखराज हा पुरता हादरून गेला.

advertisement

आपल्या आईचा मृत्यू झाल्याचे आरोपी मुलाला कळताच आरोपी मुलाने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती आज सकाळी सालेकसा पोलिसांना मिळाल्यानंतर घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईच्या डोक्यात लेकाने घातली कुऱ्हाड, जीव जाईपर्यंत तसाच होता उभा, नंतर पळत गेला आणि.., गोंदिया हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल