४० वर्षांची साथ सोडली
मुख्तार शेख हे गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होते. या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून शहराचे प्रतिनिधित्व केले आहे. पुणे काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक समाजाचा मोठा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर आरोप केले आहेत. "काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक समाजाला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांकावर अन्याय होत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
advertisement
अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची पाळंमुळं घट्ट करणाऱ्या शेख पिता-पुत्रांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग निवडला आहे. मुख्तार शेख यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव विकार शेख यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पुण्यातील काँग्रेसच्या व्होट बँकवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे बदलणार?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत ४० वर्षे पक्षासाठी झटणारा नेता सोडून गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
