TRENDING:

Mumbai Congress : मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा दिल्लीच्या दारात, वर्षा गायकवाडांविरोधात मोर्चेबांधणी?

Last Updated:

Mumbai Congress : मुंबई काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी पोहचला आहे. विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरोधातील मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली: मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. काल (13 जुलै) मुंबईत काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान बचाव जनसभा’ या महत्त्वाच्या कार्यक्रमात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबई काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी पोहचला आहे. विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरोधातील मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा दिल्लीच्या दारात, वर्षा गायकवाडांविरोधात मोर्चेबांधणी?
मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा दिल्लीच्या दारात, वर्षा गायकवाडांविरोधात मोर्चेबांधणी?
advertisement

'संविधान बचाव जनसभा' मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पार पडली होती. या सभेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार इमरान प्रतापगडी यांनी संविधानाच्या रक्षणासाठी देशभरातील जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच येणाऱ्या बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असा संदेशही त्यांनी दिला. कार्यक्रमात आमदार असलम शेख आणि आमदार अमीन पटेल हे उपस्थित होते. मात्र, माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि वरिष्ठ नेते नसीम खान या दोघांच्या अनुपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

advertisement

वारंवार पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चेत येणारे नसीम खान आणि भाई जगताप हे सध्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू आहेत.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम खान आणि भाई जगताप हे सध्या दिल्लीला रवाना झाले असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बैठकीत सहभागी होणार आहेत. अधिकृतरीत्या ही भेट वेगळ्या कारणासाठी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी दोन्ही नेते “मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला डावलले जात आहे” अशी तक्रारही यावेळी मांडणार असल्याची शक्यता आहे.

advertisement

मुंबई काँग्रेसला आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटपणा आणि एकजूट आवश्यक असताना, या प्रकारचे अंतर्गत मतभेद पक्षासाठी अडथळा ठरू शकतात, अशी चर्चा सध्या काँग्रेस वर्तुळात सुरू आहे. आता दिल्लीतील बैठकीनंतर मुंबई काँग्रेसमधील सत्तासमीकरणात काही बदल होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Congress : मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा दिल्लीच्या दारात, वर्षा गायकवाडांविरोधात मोर्चेबांधणी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल