मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास अब्बू तल्हा अवल बेग (५७), उर्फ तुला शेठ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तरुणाने त्यांच्या मानेखाली गोळीबार केला.
त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते जमिनीच्या खरेदी-विक्रीचे काम करतात. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अब्बू तल्हा बेग पुढे चालताना स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्या मागे एक तरुण चालत आहे. थोड्या अंतरावर गेल्यानंतर, तो मागून गोळीबार करतो आणि पळून जातो. त्याचा एक साथीदार दुचाकी घेऊन रस्त्यावर उभा आहे, ज्यावरून तो पळून जाण्यात यशस्वी होतो. कुरार पोलीस आरोपीचा सक्रीयपणे शोध घेत आहेत.
advertisement
आरोपी आणि जखमी हे दोघेही मित्र आहेत. या दोघांमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून भीषण वाद झाला आणि त्याचे पर्यवसान थेट गोळीबारात झाले. या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रॉपर्टीच्या वादातून एकाने आपल्या मित्रावर थेट गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याला तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
.
आरोपीने वादातून एका ते दोन फायरिंग राऊंड केल्याची माहिती समोर आली. मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार करणारा आरोपी सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके करण्यात आली.