TRENDING:

Bird Park: दुर्मिळ पक्ष्यांना मिळणार मुंबईत निवारा, महापालिका करणार 166 कोटींचा खर्च

Last Updated:

Bird Park: या प्रकल्पासाठी सुमारे 166 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. महानगरपालिका प्रशासनाने या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी आणि वनस्पती संग्रहालयात एक पक्षी विभाग देखील आहे. येथे देश-विदेशातील विविध प्रजातींच्या पक्षी बघायला मिळतात. आता याच धर्तीवर मुलुंड पश्चिम येथील नाहूर गाव परिसरात एक पक्षी उद्यान उभारलं जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे मुलुंड येथे उभारल्या जाणाऱ्या या पक्षी उद्यानात सर्व सुविधा असतील. महानगरपालिका प्रशासनाने या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
Bird Park: दुर्मिळ पक्ष्यांना मिळणार मुंबईत निवारा, महापालिका करणार 166 कोटींचा खर्च
Bird Park: दुर्मिळ पक्ष्यांना मिळणार मुंबईत निवारा, महापालिका करणार 166 कोटींचा खर्च
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड येथील पक्षी उद्यान हे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचं उपकेंद्र असणार आहे. हे काम पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. 17,958 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानात 18 दुर्मीळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 166 कोटी रुपये खर्च येऊ शकतो.

advertisement

Thane News: 'धोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करा', आयुक्त सौरभ राव अ‍ॅक्शन मोडमध्ये

या उद्यानात पक्ष्यांसाठी प्रशस्त आणि नैसगिक निवारे असतील. पक्षीगृहात प्रवेश करण्यापूर्वी मोठे धबधबे आणि प्रवाह असतील. याशिवाय, पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी खुले प्लाझादेखील असणार आहेत.

पक्षी उद्यानात कोणते पक्षी असतील?

या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशा खंडांनुसार पक्ष्यांची विभागणी केली जाणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींसाठी निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या 18 दुर्मीळ प्रजातींसह 206 पक्षी येथे ठेवले जाणार आहेत.

advertisement

दरम्यान, मुलुंड येथील पक्षी उद्यान प्रकल्पाचा खर्च अवघ्या चार महिन्यांत 66 कोटींनी वाढल्याचा दावा वॉचडॉग फाउंडेशनने केला आहे. हा सार्वजनिक पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bird Park: दुर्मिळ पक्ष्यांना मिळणार मुंबईत निवारा, महापालिका करणार 166 कोटींचा खर्च
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल