30 सप्टेंबरपर्यंत धोक्याचा इशारा
भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोका असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने सांगितले आहे.
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
सतर्कतेचा सूचना :
घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होऊ शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी.
सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवावे.
सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करणे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्ह्या इमारतीवर CSSR च्या दृष्टिने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
वीज व रस्ते पायाभूत सुविधा: दुरुस्ती पथक, साखळी आरें व फिडर संरक्षण युनिट तैनात करावे.
धरन निरीक्षण: कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरनांसाठी दररोज आदळवा घेण्यात यावा.
जनतेसाठी माहिती प्रसार: आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत असून, त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहावे.
जिल्हा व संपर्क क्रमांक
१. धाराशिव - ०२४७२-२२७३०१ २. सोलापूर - ०२१७-२७३१०१२
३. बीड - ०२४४२-२९९२९९ ४. अहिल्यानगर - ०२४१-२३२३८४४
५. परभणी - ०२४५२-२२६४०० ६. नांदेड - ०२४६२-२३५०७७
७. लातूर - ०२३८२ २२०२०१ ८. रायगड - ८६५७७५२४६३
९. रत्नागिरी - ७०५७२२२३३३ १०. पालघर- ०२५२५ २९६०७४
११. सिंधुदुर्ग- ०२३६२ २२८८४७ १२. ठाणे- ९७६७३३८८२७
१३. पुणे - ९३७१०९६००६१ १४. सातारा- ०२१६२ २३२३४९
१५. मुंबई शहर आणि उपनगर- ९९६७ ०२२ ६९४०३३४४.