Python on Road : मुंबई-पुणे एक्सप्रेस- वे रात्रीच्या वेळी ठप्प, अजगराच्या एन्ट्रीने सगळेच गपगार; Video व्हायरल

Last Updated:

Python on Road : जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवरील टोलनाका येथील धानसर गावाजवळ भला मोठा अजगर महामार्गावर वाटेत आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18
News18
अनेकदा महामार्गावरील वाहतूक मोठ्या अपघातामुळे ठप्प होते. त्यामुळे अनेक तास प्रवाशांना वाहतूक कोंडीमध्ये वेळ घालवावा लागतो. यासोबतच प्राण्यांमुळेही महामार्गावर वाहतूक ठप्प झालेल्याचे आपण पाहिलेय. मात्र शनिवारी रात्रीच्या वेळेस अजगराने काही काळ वाहतूक कोंडी केल्याचे दिसून आले. जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवरील टोलनाका येथील धानसर गावाजवळ भला मोठा अजगर महामार्गावर वाटेत आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जुन्या मुंबई- पुणे एक्सप्रेस रोडवरील टोलनाका येथील धानसर गाव येथे महामार्गावर एक भला मोठा अजगर रोड ओलांडून जात होता. अजगराची चाल हळूहळू आणि संथगतीने असल्यामुळे त्याला जाण्यास काही वेळ लागला. तेवढ्या वेळेच्या त्याच्या जाण्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान अजगराला सुरक्षितपणे महामार्ग वाहन चालकांनी रस्ता ओलांडून दिला. त्यानंतरच या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. अनेकदा रस्त्यावर अनावधानाने प्राणी येत असतात. त्यांच्या अचानक येण्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
advertisement
जुन्या मुंबई- पुणे एक्सप्रेस रोडवरील टोलनाका येथील धानसर गावाजवळ अचानक अजगर आल्यामुळे परिसरामध्ये काही वेळेसाठी वाहतूक कोंडी झाली होती. अजगराने मार्ग ओलांडल्यानंतरच ही संपूर्ण वाहतूक सुरळीत झाली. वाहनचालकांनीही पर्यावरण रक्षणासाठी जंगलातील प्राण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्या प्राण्याला कोणतीही इजा न पोहोचवता किंवा बाजूला न करता त्याला त्याच्या मार्गाने सुखरूप जाऊ दिले, त्यानंतरच हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाला. वाहन चालकांनीही सुद्धा या अजगराला हा महामार्ग सुरक्षितपणे ओलांडून देत पर्यावरण रक्षणाचा एक प्रकारे संदेशच दिला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Python on Road : मुंबई-पुणे एक्सप्रेस- वे रात्रीच्या वेळी ठप्प, अजगराच्या एन्ट्रीने सगळेच गपगार; Video व्हायरल
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement