Royal Enfield ची सगळ्यात स्वस्त बाइक, GST.20 मुळे इतकी कमी झाली किंमत!

Last Updated:

वजनदार बाइक म्हणून ओळख असलेल्या  royal enfield ने सुद्धा आपल्या बाईकच्या किंमतीत कपात केली आहे. royal enfield hunter 350 ची जीएसटी कपात केल्यानंतरची किंमत आता जाहीर झाली आहे.

News18
News18
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहे. २८ टक्के स्लॅब हा रद्द झाला आहे. २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी प्रणाली लागू झाली आहे. एकीकडे कार खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. तर दुसरीकडे दुचाकीच्या किंमतीही कमी झाल्या आहे. वजनदार बाइक म्हणून ओळख असलेल्या  royal enfield ने सुद्धा आपल्या बाईकच्या किंमतीत कपात केली आहे. royal enfield hunter 350 ची जीएसटी कपात केल्यानंतरची किंमत आता जाहीर झाली आहे.  या बाइक किंमतीत तब्बल १२ हजार ते १५ हजार रुपये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे बेस-स्पेक फॅक्टरी व्हेरिएंटची किंमत आता सुमारे 1.38 लाख आहे, तर हाय ट्रिम्सची किंमत सुमारे 1.67 लाख आहे.
350cc इंजिन असलेल्या बाइक्सना GST 2.0 अंतर्गत करातून सूट देण्यात आली आहे. नवीन कर दर 22 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, अनेक 350cc बाइक्सवरील प्रभावी कर भार कमी झाला आहे, म्हणून उत्पादकांनी त्यांच्या मॉडेल्सच्या किमती अपडेट केल्या आहेत.
hunter 350 व्हेरिएंटनवी किंमत
फॅक्टरी ब्लॅकRs 1,37,640
ग्रेफाइट ग्रेRs 1,62,292
डॅपर ग्रेRs 1,62,292
रिओ व्हाइटRs 1,62,292
टोकियोRs 1,66,883
लंडन रेडRs 1,66,883
रिबेल ब्लूRs 1,66,883
advertisement
7 कलर ऑप्शन 
royal enfield hunter 350 मध्ये आता 7 रंगाचा पर्याय देण्यात आला आहे. नवीन ग्रेफाइट ग्रे टँकभोवती गडद छटासह वेगळा दिसतो, तर काळा मडगार्ड आणि हेडलाइट काऊल  आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, रॉयल एनफील्डने हंटर लाइनअपमध्ये रिओ व्हाइट, टोकियो ब्लॅक आणि लंडन रेडसह ३ नवीन रंग पर्याय दिले होते.
advertisement
इंजिन आणि पॉवर
रॉयल एनफील्ड हंटरमध्ये 349cc, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे 20.2 bhp आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड गिअरबॉक्सद्वारे मागील चाकाला पॉवर पाठवला जातो, जो आता स्लिप आणि असिस्ट क्लचसह येतो. दिल्लीमध्ये या बाईकची सुरुवातीची किंमत 1,37,640 लाख रुपये आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Royal Enfield ची सगळ्यात स्वस्त बाइक, GST.20 मुळे इतकी कमी झाली किंमत!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement